गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाकरिता राज्य परिवहन महामंडळानं आजपासून अडीच हजार बस गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. आजच्या गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवाशांमध्ये वाढ होईल, हे गृहीत धरून 12 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबई, बोरीवली, ठाणे, पुणे आदी ठिकाणी जाणाऱ्या अतिरिक्त बसफेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. ऑनलाइन आरक्षण सुरू असून, गट नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुहागर तालुक्यातून सर्वाधिक 208 गाड्यांची गट नोंदणी करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
Site Admin | September 12, 2024 9:28 AM | Ganeshotsav | ST Buis
गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीसाठी आजपासून एसटीच्या अडीच हजार फेऱ्यांचं नियोजन
