डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई – पुण्यात झालं आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा