राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा ७ पद्म विभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्म पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
सुप्रसिद्ध लेखक मारुती चितमपल्ली, अभिनेता अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांवर अल्प दरात उपचार करणारे डॉ. विलास डांगरे, गायिका अश्विनी भिडे, बासरी वादक रोणू मुजुमदार, चित्रकार वासुदेव कामत, पर्यावरण वादी कार्यकर्ते चैतराम पवार यांच्यासह माहेश्वरी हँडलुम साठी सॅली होळकर, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या राधा भट, कर्नाटकातले ज्येष्ठ गोंधळी गायक वेंकप्पा सुगतेकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.