राज्यातल्या ४३ पोलिस अधिकाऱ्यांना विविध शौर्य पदक जाहीर
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पोलिस, गृहरक्षक दल, अग्निशमन, आणि नागरी सेवांसह इतर सुरक्षा सेवांमधल्या ९४२ कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. यापैकी, ९५ कर्मचाऱ्यांना आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. १०१ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकं तर ७४६ कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवा पदकं बहाल केली जाणार आहेत.
राज्यातल्या एकूण ४३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार जाहीर झाले आहेत. हवाई दलातले स्क्वाड्रन लीडर प्रथमेश डोंगरे यांना वायुसेना शौर्य पदक जाहीर झालं आहे. याशिवाय कॉर्पोरल विकी पहाडे यांना मरणोत्तर वायुसेना शौर्य पदक मिळणार आहे.
रविंद्र कुमार सिंगल, दत्तात्रय कारळे, सुनील फुलारी आणि रामचंद्र केंडे या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. याशिवाय ३९ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे.
त्यात संजय दराडे, विरेंद्र मिश्रा, आरती सिंग, चंद्र किशोर मीना, दीपक साकोरे, राजेश बनसोडे, सुनिल तांबे, ममता डिसुझा, धर्मपाल बनसोडे, मधुकर सावंत, राजेंद्र कोते, रोशन यादव, अनिल लाड, अरुण डुंबरे, नाजिर नासिर शेख, श्रीकांत तावडे, महादेव काळे, तुकाराम निंबाळकर, आनंदराव म्हस्के, रविंद्र वानखेडे, सलीम गनी शेख, तुकाराम आव्हाळे, रामभाऊ खंडागळे, संजय चोबे, सय्यद इक्बाल हुसेन सय्यद मथार हुसेन, अयुब खान अकबर मुल्ला यांचा यात समावेश आहे.
याशिवाय कारागृह सेवेतल्या ५ जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात विवेक झेंडे, अहमद मनेर, गणेश गायकवाड, तुळशीराम गोरवे यांचा समावेश आहे.