प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पोलिस, गृहरक्षक दल, अग्निशमन, आणि नागरी सेवांसह इतर सुरक्षा सेवांमधल्या ९४२ कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. यापैकी, ९५ कर्मचाऱ्यांना आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. १०१ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकं तर ७४६ कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवा पदकं बहाल केली जाणार आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. नांदेड पोलीस नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय अंबादासराव जोशी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप भोजूसिंग राठोड या कर्मचाऱ्यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे.
Site Admin | January 25, 2025 3:18 PM | 76th Republic Day
प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळ्यात ९४२ कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान करण्यात येणार
