कॉर्पोरेट जगात पाऊल ठेवताना स्वतःला सिद्ध करा आणि आपल्या गुणांच्या आधारे कुटुंब तसंच संस्थेची प्रतिष्ठा वाढविण्याचं कार्य करा असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल पुण्यात विद्यार्थ्यांना केलं. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहोळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विज्ञान क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर कृष्णस्वामी विजय राघवन यांना “एमआयटी विज्ञान महर्षी सन्मान” देऊन याप्रसंगी गौरविण्यात आलं. सन्मानपत्र, सरस्वतीची मुर्ती आणि रोख 5 लक्ष रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी विद्यापीठाच्या साडेपाच हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आलं.
Site Admin | October 20, 2024 8:50 AM | Gajendra Singh Shekhawat