डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पर्यटन क्षेत्रात अधिक विकासासाठी खाजगी गुंतवणूक वाढवणं आवश्यक – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत

देशात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असून,या क्षेत्रात अधिक विकासासाठी खाजगी गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे, अस मत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केल. मेघालयात शिलॅांग इथ पर्यटनमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. देशात पर्यटन विकासाला चालना मिळावी आणि सर्व राज्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी केंद्रसरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीची साखळी आयोजित करण्यात येत आहे . त्यातील तिसरी बैठक काल झाली. यात ईशान्येकडील राज्ये , पूर्व भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे पर्यटनमंत्री सहभागी झाले होते. यापूर्वी चंदीगड आणि गोवा इथ या बैठका झाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा