आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयानं दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यानं गरोदर माता नोंदणी, माता – बाल संगोपन, मुलांचं लसीकरण, हिवताप आणि क्षयरोग निर्मूलन अशा वेवेगवेगळ्या ६४ आरोग्य निर्देशांकांत केलेल्या कामगिरीवरून आरोग्य सेवा आयुक्त कार्यलयानं हे गुणांकन केलं आहे. आरोग्य सेवेत यापुढे देखील अव्वल राहण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Site Admin | January 13, 2025 8:28 PM | Gadchiroli
आरोग्यविषयक कार्यक्रम अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली राज्यात तिसरा
