सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो, आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी त्यांची नावं आहेत.
शामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी असून २००२ मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सहभागी झाली. सध्या ती कंपनी क्रमांक १० ची सेक्शन कमांडर होती. तिच्यावर २१ चकमकी, ६ जाळपोळ, आणि इतर १८, अशा एकूण ४५ गुन्ह्यांची नोंद आहे. शासनानं तिच्यावर ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले होतं.
काजल वड्डे २०१८ पासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती. एकूण ८ गुन्ह्यांची नोंद आहे. शासनानं तिच्यावर दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.