अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या नक्षल दाम्पत्यानं आज केंद्रीय राखीव दल आणि गडचिरोली जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. वरुण राजा मुचाकी उर्फ उंगा उर्फ मनिराम उर्फ रेंगू याच्यावर १५ गुन्हे दाखल असून सरकारनं त्याच्यासाठी ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तो छत्तीसगडचा असून तो सध्या भामरागड दलमचा कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी रोशनी विजया वाच्छामी हिच्यावरही २३ गुन्हे दाखल असून सरकारनं तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.
Site Admin | October 14, 2024 7:02 PM | Gadchiroli
नक्षल दाम्पत्याचं केंद्रीय राखीव दल आणि गडचिरोली जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण
