गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी या शेवटच्या टोकाच्या तीन अतिदुर्गम गावांसाठी राज्य परिवहन महामंडळानं बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. यामुळे या गावातील आदिवासी बांधवांची मोठी सोय झाली आहे. या नागरिकांनी बस सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. त्यावर फडणवीस यांनी तत्काळ कार्यवाही केली.
Site Admin | March 23, 2025 7:52 PM | Gadchiroli | MSRTC
गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम गावांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या सुरू
