गडचिरोली जिल्ह्यातल्या कटेझरी गावात काल प्रथमच राज्य परिवहन मंडळाची बस पोहोचली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ढोलताशांच्या निनादात आनंद व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बसचं स्वागत केलं तर कटेझरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी बसला हिरवा झेंडा दाखवला.
धानोरा तालुक्यातलं अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल हे गाव असून आजूबाजूच्या १० ते १२ गावातल्या नागरिकांना या बससेवेचा लाभ मिळणार आहे.