गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटकं शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलिस मदत केंद्रांतर्गत, करंचा गावानजीकच्या जंगलातून ही स्फोटकं शिताफीने बाहेर काढून ती नष्ट करण्यात आली. जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात मरपल्ली पोलिस मदत केंद्रातील पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी ही शोध मोहीम राबवली.