नक्षलवादी चळवळीत सक्रीय असणाऱ्या एका दाम्पत्यानं आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. असिन राजाराम कुमार आणि अंजू सुळ्या जाळे अशी या दोघांची नावं आहेत. असिन हा ओदिशातील नक्षल चळवळीच्या प्रेस टीममध्ये एरिया कमिटी मेंबर म्हणून काम करायचा तर अंजू ही याच दलममध्ये सदस्य होती. २०२२ पासून आतापर्यंत २९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.
Site Admin | October 19, 2024 7:45 PM | Gadchiroli
नक्षलवादी चळवळीत सक्रीय एका दाम्पत्यानं पोलिसांपुढे आत्मसमर्पण
