ब्राझीलमध्ये सुरू होणाऱ्या जी-20 परिषदेत भारतात गेल्या वर्षी झालेल्या जी-20 परिषदेत अपुरं राहिलेलं काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे. गरिबी आणि उपासमार यांच्याविरुद्धचा लढा, महिलांचं सक्षमीकरण, सर्वसमावेशक विकास या विषयांवर गेल्या जी -20 परिषदेत चर्चा झाली असली तरीही त्यावर सर्व देशांचं एकमत झालं नव्हतं. या चर्चा यावेळी पुढे सुरू राहतील. या मुद्द्यांवर सर्व देशांचा सहभाग आवश्यक असल्याचं कांत यांनी आकाशवाणीला सांगितलं. ब्राझीलमधल्या जी 20 परिषदेचं यश सर्व देशांच्या सहमतीवर अवलंबून असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | November 18, 2024 9:20 AM | Amitabh Kant | G20Summit