जी-20 ने आपलं नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण जागतिक आव्हानांना अचूकपणे प्रतिबिंबित केलं पाहिजे असं आवाहन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं काल 2025 च्या जी-20 उद्दिष्टांवरील, जी-20 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
सध्या अन्न, ऊर्जा आणि आरोग्य सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची उभारणी आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देणं ही आव्हानं आहेत. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथे जी-20 परराष्ट्र मंत्री बैठकीत डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांच्याशी चर्चा करून द्विपक्षीय संबंधांमधील विकासाचा, आणि सीमावर्ती भागातल्या शांततेबाबत आढावा घेतला.