डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार असल्याची माहीती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या स्मारकासाठी एका विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात येणार असून सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या स्मारकाच्या निर्मितीबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळवण्यात आल्याची माहिती भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी दिली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाबमधील अमृतसर इथल्या हिंदू महाविद्यालयातून बीए ऑनर्स ची पदवी मिळवली होती. या महाविद्यालयाचे प्राचार्य संजय खन्ना यांनी महाविद्यालयाच्या आवारात डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक उभारण्यात येईल असं सांगितलं.
Site Admin | December 29, 2024 10:29 AM | Manmohan Singh