दक्षिण प्रशांत महासागरातल्या वानुआतु इथल्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी भारतानं पाच लाख डॉलर्सचं अर्थसहाय्य दिलं आहे. गेल्या १७ डिसेंबरला वानुआतुच्या किनारपट्टीजवळ ७ पूर्णांक ४ दशांश रिक्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे मोठा विनाश आणि जीवितहानी झाली होती.