पॅरिस इथं होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेआधी बहुतेक खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य द्यायला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या एम ओ सी, अर्थात मिशन ऑलिम्पिक विभागानं मान्यता दिल्याचं विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितलं. यात नेमबाज रिदम संगवान, सरबज्योत सिंग, विजयवीर आणि अनिश भानवाला यांचा समावेश आहे. तसंच स्टीपलचेसर अविनाश साबळे आणि पारुल चौधरी यांना स्वित्झर्लंडमध्ये २४ दिवस प्रशिक्षणासाठीही आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कीट नेमबाज महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका यांची विनंती देखील मान्य केल्याचं विभागानं सांगितलं. त्याच प्रमाणे अन्य खेळाडुंचीही विनंती मान्य केल्याचं सांगण्यात आलं.
Site Admin | July 4, 2024 8:40 PM | Olympic Games