पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर त्या पदार्थांमधली एकूण साखर, मीठ आणि मेदाच्या प्रमाणाची माहिती ठळक आणि मोठ्या आकारात देण्याच्या प्रस्तावाला भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं मान्यता दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज ही माहिती दिली. ग्राहकांना ते वापरत असलेल्या उत्पादनाचं पौष्टिक मूल्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला आणि आरोग्यदायी निर्णय घेण्यास सक्षम करणं हे या दुरुस्तीचं उद्दिष्ट असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.