फ्रान्सच्या नव्या प्रधानमंत्र्यांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाईल, असं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी जाहीर केलं आहे. मॅक्रोन यांनी काल संसदेला संबोधित करताना ही माहिती दिली. फ्रान्सचे प्रधानमंत्री मिशेल बार्नियर यांनी संसदेत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानं राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षाच्या दबावाला न जुमानता २०२७ मध्ये आपला कार्यकाळ संपेपर्यंत आपण पदावर कायम राहणार असल्याचं मॅक्रोन यांनी यावेळी सांगितलं. हे सरकार पाडण्यासाठी कडव्या उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी लोकशाही विरोधी मोर्चा उघडला असल्याची टीका त्यांनी केली.
Site Admin | December 6, 2024 3:16 PM | French PM