लेबनॉनमध्ये युद्ध तात्काळ थांबलं पाहिजे असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. लेबनानी संसद अध्यक्षांबरोबर फोनवरुन संवाद साधताना त्यांनी इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांबद्द्ल चिंता व्यक्त केली. पॅरिसमधे येत्या २४ तारखेला होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत लेबनीज नागरिक आणि लेबनॉनचं सार्वभौमत्व याकडे जगाचं लक्ष वेधण्याचे प्रयत्न फ्रान्स करेल असंही त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदूतांना अलीकडे लक्ष्य केलं जात असल्याबद्द्लही मॅक्रॉन यांनी नाराजी व्यक्त केली.
Site Admin | October 13, 2024 8:30 PM