डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले असून यानुसार न्यू पॉप्युलर फ्रंट ही डावी आघाडी १७५ ते २०५ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला येत आहे, तर इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या नेतृत्वाखालची मध्यममार्गी एन्सेम्बल अलायन्स दीडशे ते १७५ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. फ्रान्समधली अति उजवी आघाडी – नॅशनल रॅली तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. ही आघाडी ११५ ते दीडशे जागा जिंकेल. कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नसून त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. 

 

मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात ५७७ पैकी ५०१ जागांवर निवडणूक झाली. पहिल्या टप्प्यात ७६ जागांवर निवडणूक झाली होती. 

 

दरम्यान, मॅक्राँ यांच्या नेतृत्वाखालच्या आघाडीचा पराभव झाल्यामुळे प्रधानमंत्री गॅब्रीयल अटल यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा