भारत आणि फ्रान्स यांच्यातील वरुण या संयुक्त नौदल सरावात सहभागी होण्यासाठी फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका चार्ल्स डी गॉल काल गोव्यात दाखल झाली. गोव्याच्या मुरगाव पोर्ट ट्रस्ट जेट्टीवर काल या विमानवाहू नौकेचं आगमन झाल्यावर भारतीय नौदलाच्या वाद्यपथकानं औपचारिक स्वागत केलं. उभय देशांच्या नौदलांमधे कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे. हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षेसाठी योगदान देण्यासाठी फ्रान्स आणि भारत नियमितपणे परस्पर सहकार्य करत आहेत.
Site Admin | January 5, 2025 12:59 PM | French Navy | Indian Navy