डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला न्यूयॉर्कमध्ये सुरुवात

यावर्षीच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला काल न्यूयॉर्कमध्ये सुरुवात झाली. आज सकाळी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत सुमित नागलचा सामना डच खेळाडू टॅलन ग्रीक्सपूरशी होईल. एका वर्षातील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या एकेरी स्पर्धेत भाग घेणारा नागल हा 2019 नंतरचा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.

दोन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांना पुरुष दुहेरीत स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबॉलोस यांच्या नंतरचं दुसरं मानांकन मिळालं आहे. पुरुष एकेरीत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील गतविजेता नोव्हाक जोकोविच, फ्रेंच खुली स्पर्धा आणि विम्बल्डन विजेता स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला इटलीचा जॅनिक सिन्नर आदी खेळाडू खेळणार आहेत.

महिला एकेरीत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील गतविजेत्या अमेरिकेच्या कोको गॉफने काल रात्री पहिल्या फेरीत फ्रान्सच्या वरवारा ग्रॅचेवाचा 6-2, 6-0 असा पराभव केला. याच स्पर्धेतील माजी विजेती पोलंडची इगा स्विटेक, जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेली कझाकिस्तानची एलेना रायबाकिना आणि दोन वेळची ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील विजेती आर्यना सबालेन्का याही या स्पर्धेत भाग घेत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा