डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा सामना ब्राझीलच्या ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीसोबत होणार

स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या विजेतेपदासाठी आज फ्रान्सच्या ग्रेगोयर जॅक आणि मॅन्युअल गुइनार्ड या जोडीचा सामना ब्राझीलच्या ऑरलँडो लझ आणि राफेल मातोस या जोडीसोबत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजता ही लढत सुरू होईल.

फ्रान्सच्या जोडीनं इक्वेडोर आणि कझाकस्तानच्या अलेक्झांडर आणि गोंझालो यांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर राफेल नदाल आणि कॅस्पर रुड या जोडीनं माघार घेतल्यानं ब्राझीलच्या जोडीला पुढे चाल मिळून त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठीही आजच राफेल नादाल आणि पोर्तुगालचा नुनो बोर्जेस यांच्यात अंतिम लढत होणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता हा सामना सुरू होईल. या लढतीमुळेच नादाल यानं दुहेरीतून माघार घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा