संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य म्हणून भारताचा समावेश व्हावा यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जोरदार पाठिंबा व्यक्त केला आहे. आज सकाळी न्युयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेच्या ७९ व्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं, की भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील हे स्थायी सदस्य असले पाहिजेत. त्याबरोबरच आफ्रिकेतल्या दोन देशांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सुरक्षा समिती अधिक प्रभावी आणि प्रातिनिधीक करण्यासाठी तिच्या सध्याच्या रचनेत सुधारणा करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. त्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लाव्हरोव्ह, आणि चिलीचे अध्यक्ष ग्रॅब्रियेल बोरिक फोन्ट यांनी भारताला स्थाई सदस्यत्व मिळावं यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.
Site Admin | September 26, 2024 8:42 PM | France | India