केरळमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी आज चित्तूर नदीत अडकलेल्या चार जणांची सुटका केली. पल्लकड जिल्ह्यात चित्तूर नदीत चार जण आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, तामिळनाडूच्या आलियार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे पाण्याची पातळी वाढून ते नदीतल्या खडकावर अडकले. अग्निशमन दलाने दोरी आणि जीवरक्षक जॅकेटच्या साहाय्यानं त्यांची सुखरूप सुटका केली.
Site Admin | July 16, 2024 7:47 PM | केरळ | चित्तूर नदी
केरळमध्ये चित्तूर नदीत अडकलेल्या चार जणांची सुटका
