केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनेक महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आलं. त्यांनी काही प्रकल्पांचं लोकार्पण केलं. या प्रकल्पांमुळे राज्यातील नौकानयन पर्यटन आणि आयात-निर्यात क्षेत्राला चालना मिळेल असं गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. गोवा प्रदूषण आणि अपघातमुक्त करण्यासाठी गोवा सरकारने प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
Site Admin | January 22, 2025 11:21 AM | नितीन गडकरी | महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी