सरकार जनतेच्या सेवेसाठी समर्पित असून याच उद्देशानं सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेमुळे जनतेच्या सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. बिहारमधल्या दरभंगा शहरात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज १२ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात, सुमारे १२ अब्ज ६० कोटी रुपये खर्चून दरभंगा इथं बांधण्यात येणाऱ्या एम्सची पायाभरणी केली. तसंच विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. प्रधानमंत्र्यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या विविध रेल्वे स्थानकांवरच्या भारतीय जनऔषधी केंद्राचंही उद्घाटन केलं. तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातल्या योजनांची पायाभरणी देखील केली.
Site Admin | November 13, 2024 3:41 PM | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी | बिहार | विकास कामांची पायाभरणी
बिहारमध्ये १२ हजार कोटींच्या विकासकामांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि लोकार्पण
