केंद्रीय गृहविभागाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला यांनी आज मणिपूरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मणिपूर उच्च न्यायालयाचे मुक्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग, विधानसभा अध्यक्ष, मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर आमदार शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. भल्ला भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८४ च्या तुकडीतले आधिकारी होते.
Site Admin | January 3, 2025 2:22 PM | Ajay Kumar Bhalla | Former Union Home Secretary | Governor of Manipur | Manipur | oath ceremoney