केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८३मधल्या तुकडीतल्या अधिकारी आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुदन यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. उद्यापासून प्रीती सुदन पदभार स्वीकारतील. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे याआधीचे अध्यक्ष डॉ. मनोज सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच या महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता.