बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायावर सुरु असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांनी बांगलादेशातील अंतरीम सरकारवर टीका केली आहे. न्यूयॉर्क मधल्या एका क्रार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीनं दिलेल्या संदेशात त्यांनी म्हटल आहे की, मुहम्मद युनूस अल्पसंख्याकांच्या आणि हिंदूंच्या हिताचं रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. बांगला देश सोडायला लागल्यानंतर शेख हसीना पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.