माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीतल्या निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख धर्मगुरू आणि डॉक्टर सिंग यांच्या कुटुंबीयांनी अंतिम संस्कारापूर्वी गुरबानीचं पठण केलं. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीतल्या कॉँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात त्यांच पार्थिव शरीर अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आल होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, कॉँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी माजी पंतप्रधानांना अंतिम श्रद्धांजली वाहिली.
Site Admin | December 29, 2024 10:22 AM | Manmohan Singh | narendra modi