आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं. ते १०२ वर्षांचे होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची बातमी तमिळ भाषेत आकाशवाणीवरून त्यांनी पहिल्यांदा दिली होती. ही बातमी रेडिओ सिलोनवरून पहाटे पावणे सहा वाजता प्रसारित झाली होती. वेंकटरमण यांनी आकाशवाणीसाठी नियमित आणि प्रासंगिक कलाकार म्हणून ६४ वर्षे काम केलं.
Site Admin | February 5, 2025 2:02 PM | आकाशवाणी | निधन | वेंकटरमण
आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं निधन
