नांदेड जिल्ह्यातले किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं आज हैदराबाद इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. २००४, २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग तीन वेळा त्यांनी किनवट मतदार संघात विजय मिळवला होता. त्यांच्या पार्थिवावर उद्या किनवट इथल्या दहेली तांडा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाईक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
Site Admin | January 1, 2025 3:51 PM | Passed Away | Pradeep Naik
किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन
