मुंबईतल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. हितेश मेहता यानं कोविड काळात बँकेच्या प्रभादेवी कार्यालयातून ११२ कोटी तर गोरेगावच्या कार्यालयातून १० कोटी असे एकूण १२२ कोटी रुपये इतरत्र वळवून, चोरी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेला होता.