तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक संचालक बंकटराव कदम यांचं काल जळकोट इथं निधन झालं. कदम यांनी कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे संस्थापक संचालक, जळकोटचे माजी सरपंच, पार्वती कन्या प्रशालेचे अध्यक्ष, महाराष्ट्र वाचनालयाचे अध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.