डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 11, 2024 1:10 PM

printer

माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंह यांचं निधन

माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंग यांचं काल रात्री दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. काही काळ त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याचं त्यांच्या कौटुंबियांनी सांगितलं. नटवर सिंह यांचा जन्म १९३१ मध्ये राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात झाला. १९८४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. नटवर सिंग यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत.

 

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सिंग हे एक उत्तम लेखक होते आणि त्यांच्या योगदानासाठी ते कायम स्मरणात राहील, असं उपराष्ट्रपतींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे, तर  परराष्ट्र धोरण आणि जागतिक मुत्सद्देगिरीमध्ये सिंग यांनी भरीव योगदान दिल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा