दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने कथित अबकारी धोरणातल्या अनियमितता प्रकरणी जामीन मंजूर केला आहे.
सिसोदिया सतरा महिन्यांपासून कोठडीत होते, मात्र त्यांच्यावर अजूनही खटला सुरू झाला नाही. त्यामुळे जलद सुनावणी करण्याच्या त्यांच्या अधिकाराचं हनन होत असल्याचं सांगत न्यायालयाने सिसोदिया यांना ईडी आणि सीबीआय या दोन्ही खटल्याप्रकरणी जामीन मंजूर केला.