पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचं आज कोलकत्यात निधन झालं. ते ८० वर्षांचे होते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन आपल्यासाठी धक्कादायक आणि दुःखदायक असल्याचं समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. भट्टाचार्य यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पश्चिम बंगालचे राज्य सचिव मोहम्मद सलिम यांनी भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भट्टाचार्य हे एक उत्तम प्रशासक, प्रामाणिक – धर्मनिरपेक्ष व्यक्ती होते. त्यांना गमावणं हे आमचं मोठं नुकसान असल्याचं सलिम म्हणाले. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी देहदान केल्यामुळे जनतेनं आदरांजली अर्पण केल्यानंतर त्यांचं पार्थव रुग्णालयाला सुपूर्द करण्यात येईल असं सलिम यांनी सांगितलं.
बुद्धदेव भट्टाचार्य हे २००६ ते २०११ या काळात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.