गुजरातमधे पाऊस आणि पुरानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या नेतृत्वाखाली आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्यातल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देणार आहे.
यावर्षी गृह मंत्रालयानं विविध राज्यांसाठी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकांची स्थापना केली असून या पथकानं आसाम केरळ मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीचं जागेवरच मूल्यांकन करण्यासाठी त्या राज्यांकडून मदतीची मागणी येण्यापूर्वीच आगाऊ भेट दिली आहे याशिवाय नागालँड साठी देखील अंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक स्थापन करण्यात आलं असून ते लवकरच राज्यातल्या बाधित भागांना भेट देईल