राज्य सरकारनं आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि सायबर सुरक्षा धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान संचालक या दोन्ही कृती दलाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय खासगी क्षेत्रातल्या अनेक तज्ञांचा समावेश यामध्ये आहे. AI धोरण राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देईल, असं माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार म्हणाले. तर नागरिक, शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि सरकारी क्षेत्रासाठी एक मजबूत सायबर सुरक्षा प्रणाली निर्माण करणे, सरकारी आणि निमसरकारी आयटी पायाभूत सुविधांची सुरक्षा करणे हा सायबर सुरक्षा धोरणाचा मुख्य हेतू आहे.