अमेरिकेत ३० दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या सर्व परदेशी नागरिकांनी संघीय सरकारकडे नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं अमेरिकी सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचे पालन न केल्यास त्यांना कठोर दंड, तुरुंगवास, तसंच हद्दपारीला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे.
नवीन नियमानुसार सर्व व्हिसा धारक आणि वैध कायम निवासी परदेशी नागरिकांना नोंदणीचे पुरावे स्वतःसोबत कायमस्वरूपी बाळगावे लागतील. अमेरिकेत ३० दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या तसंच देशात नव्यानं प्रवेश केला असल्यास एका महिन्याच्या आत या सर्वांना नवीन नियमानुसार कार्यवाही करावी लागेल. वयाची १४ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांनाही पुनर्नोंदणी करणं आवश्यक राहणार आहे.