डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दहशतवाद्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा क्वाड गटातील परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा

दहशतवाद्यांकडून सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा इशारा क्वाड गटातील चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला आहे. त्याविरोधात संयुक्त राष्ट्र संघाच्या यादीतील दहशतवादी संघटनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

लष्कर- ए-तैयबा, जैश-ए महंमद तसंच अल कायदा आणि इस्लामिक स्टेट या संघटनांचा त्यामध्ये समावेश आहे. दहशतवाद पसरवण्याच्या हेतूनं करण्यात येणाऱ्या नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे निर्माण होणारे धोके रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक भागीदारांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहेत, असं क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या टोकियो येथे झालेल्या बैठकीनंतर काल जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.

 

26/11 च्या मुंबई आणि 2016 च्या पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची आठवण करू देत या हल्ल्यातील दोषींना विनाविलंब न्याय मिळवून देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा