भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमीर खान मुत्ताकी यांनी काल दुबईत द्विपक्षीय मुद्द्यांवर विविध घडामोडींवर चर्चा केली. अफगाणी नागरिकांशी भारताची ऐतिहासिक मैत्री आणि दोन्ही देशांमधल्या नागरिकांचे दृढ संबंध या चर्चेत अधोरेखित करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.
अफगाणी नागरिकांच्या विकासासाठी तातडीच्या गरजांबाबत भारताची तयारी असल्याचं अफगाणिस्तानकडे कळवण्यात आलं आहे. भारतानं यापूर्वी मानवी भावनेतून अफगाणिस्तानला पन्नास हजार टन गहू, तीनशे टन औषधं, चाळीस हजार लिटर कीटननाशकं, दहा कोटी पोलिओ डोस अशी विविध प्रकारची मदत उपलब्ध करून दिली आहे.