परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज दोन दिवसीय दौऱ्यासाठी इस्लामाबादला रवाना होणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री ९ वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये जात आहेत. या बैठकीदरम्यान पाकिस्तान सोबत कुठलीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचं जयशंकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. भारतासह इराण, कझाकस्तान, चीन, किर्गिज प्रजासत्ताक, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान हे ९ देश या संघटनेचे सदस्य आहेत.