परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल बर्लिनमध्ये जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. पश्चिम आशियातील परिस्थिती, विशेषत: गाझा संघर्ष आणि त्याचे परिणाम यासह व्यापार, गुंतवणूक, शाश्वत विकास, कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा या विषयांवर लक्ष केंद्रित करून भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेण्यात आल्याचं जयशंकर यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच बर्लिनमधील परराष्ट्र कार्यालयाच्या वार्षिक राजदूतांच्या परिषदेत बोलताना डॉ जयशंकर म्हणाले की भारतीय खाजगी उद्योगांचा संरक्षण क्षेत्रातील विस्तार लक्षात घेता दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्याचा अधिक विचार करायला हवा.