विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीजच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १६ हजार ६७५ कोटी रुपये आणि पत पुरवठा बाजारामध्ये ५ हजार ३५२ कोटी रुपये गुंतवले, त्यामुळं भारतीय भांडवली बाजारात एकंदर निव्वळ गुंतवणूक २२ हजार ०२७ कोटी रुपये झाली. परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये भांडवली बाजारामधून २१ हजार ६१२ कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये ९४ हजार १७ कोटी रुपये काढून घेतले होते. विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये ५७ हजार ७२४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भांडवली बाजारातील एफपीआयचा ओघ नऊ महिन्यातील उच्चांकी होता.
Site Admin | December 30, 2024 1:46 PM | FPI