जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात परकीय संस्थांनी भारतीय भांडवली बाजारात २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.गुंतवणूकदारांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी १५ हजार ३५२ कोटी रुपये समभाग विक्री आणि ८ हजार ४८४ कोटी रुपये कर्जाऊ बाजारात गुंतवले,ज्यामुळे १२ जुलैपर्यंत भारतीय भांडवली बाजारात निव्वळ गुंतवणूक २३ हजार ८३६ कोटी रुपये झाली,असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.
Site Admin | July 15, 2024 3:56 PM | Foreign Investors | Indian markets
जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय भांडवली बाजारात परकीय संस्थांकडून २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
